23 July 2019

News Flash

महाडिकांना साथ म्हणजे पवारांना ताकद -हसन मुश्रीफ

शरद पवार यांना साथ देण्यासाठी धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करा.

आमदार हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर दुसरा मराठी माणूस दिल्ली सर करणार आहे.  शरद पवार यांना साथ देण्यासाठी धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करा. महाडिक यांच्या चुका सांगण्याची नव्हे तर प्रचाराला लागण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांंची व्यापक बैठक आयोजित केली होती. या वेळी कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन करताना मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, अद्यप आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले नसल्याने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही , पण विद्यमान खासदारांना  उमेदवारी मिळणार आहे. उमेदवार निष्टिद्धr(१५५)त झाले की काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराला सुरुवात केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गावपातळीवर दौरा पूर्ण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार महाडिक म्हणाले, की शेतकरी, युवक हा निवडणुकीत महत्त्वाचा घटक असतो, तो नाराज  असल्याचा फायदा उठवला पाहिजे. केंद्र सरकारच्या विरोधात लाट आहे. यामुळे शरद पवार यांना ताकद देऊन त्यांचे नेतृत्व उंचावले पाहिजे. या वेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींची भाषणे झाली.

कोल्हापुरात वैशिष्टयपूर्ण परिस्थिती

आमदार मुश्रीफ यांनी या वेळी कोल्हापुरात वैशिष्टयपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचे नेते दुसरम्य़ा व्यासपीठावर आणि भाजपचे नेते अन्य मंचावर दिसत आहेत. असे चित्र अन्यत्र दिसत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे बोट दाखवले.

महाडिक यांच्याकडून दिलगिरी

खासदार महाडिक यांना उमेदवारी देण्यास पक्षातून उमेदवारी देण्यास विरोध होता. त्यामुळे आज महाडिक यांनी समज —गैरसमज घडले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे नमूद करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी ‘आता पुन:पुन्हा नाराजी असल्याचे खाजगी वा  सार्वजनिक चर्चा करू नका’, अशी सूचना कार्यकर्त्यांना केली.

First Published on March 14, 2019 2:04 am

Web Title: make dhananjay mahadik win in lok sabha election 2019 hasan mushrif