गतवर्षी महापुराचा कडवट तडाखा अनुभवल्याने कोल्हापुरात आतापासूनच संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आठवडाभरात उपाययोजना आखण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
nashik police child marriage, nashik child marriage marathi news
नाशिक: पोलिसांच्या दक्षतेने बालविवाह रोखण्यात यश

सर्व विभागांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आठ दिवसांत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, अशी सूचना करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीने ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीला  पालकमंत्री  पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, जिल्’ामध्ये बोटींची यादी बनवावी. जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरुस्ती करून त्या सज्ज ठेवाव्यात. शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या असल्याने तेथे तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पुशसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा र्सवच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी.

महापूर अभ्यासाचे नियोजन

१५ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करण्यात आले. अन्य उपाय योजना याप्रमाणे- शिरोळ, करवीर, राधानगरी आदी तालुक्यात हेलिपॅड तयार करावेत. पाटबंधारे विभागाने २००५, २०१९ च्या महापुराचा अभ्यास करून नियोजन करावे. पाणी पातळी वाढल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर करावे.

स्वतंत्रपणे ‘एफएम वाहिनी’

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पाटबंधारे विभागाने जूनच्या आत धरणांच्या दुरुस्तीबाबत विशेषत: फाटकवाडी धरणाच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत. पडणाऱ्या पावसाबाबत आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत स्वतंत्रपणे एफएम वाहिनी सुरू करण्याचा विचार आहे.