कोल्हापूर : घरकुल योजनेचा लाभार्थी होण्यावरून धूमसत असलेल्या वादाला महापालिकेत शुक्रवारी तोंड फुटले. तक्रार देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी यांच्यात वाद भडकला. ‘एमआयएम’च्या कार्यकर्तांना महापालिकेतील जमावाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी देण्याचे काम सुरू होते.

सदर बाजार येथील घरकुल योजनेतून घर मिळावे यासाठी सुजित माने यांचे प्रयत्न सुरू आहेत. माने यांना घरकुलाचा लाभ देता येणार नाही, असा न्यायालयाने निकाल दिला होता. त्यामुळे असेच प्रशासनाचे म्हणणे आहे. तर हे घरकुल मिळालेच पाहिजे, यासाठी माने यांच्यासह एमआयएम संघटना आंदोलन करत आहे. यातूनच अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद धुमसत होता.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
shivraj patil chakurkar, Dr archana patil chakurkar, latur, amit deshmukh, congress, bjp
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी

शुक्रवारी कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी महापालिकेत आले होते. तर कामगार युनियनच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यांच्यातील एक कार्यकर्ता उपशहर अभियंता घाटगे यांना फोन करून उर्मट बोलू लागला. त्याने शिवीगाळ सुरु केल्याचा राग मनात ठेवून अधिकारीही चिडले. मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर अधिकारी आणि कार्यकर्ते शाब्दिक चकमक उडाली. त्यात जमावाने कार्यकर्त्यांस मारहाण करतच मनपा चौकात आणले. अधिकारी, नगरसेवक यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्या कार्यकर्त्यांची सुटका केली. या प्रकरणी एमआयएमचे प्रा. शाहिद शेख आणि महापालिकेचे अधिकारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.