आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ७० वर्षांच्या होत्या. शोभाताई कोरे या वारणा उद्योग समूहाच्या आणि वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या.

शोभाताई कोरे यांनी वारणा भगिनी मंडळ आणि वारणा बझारच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्या कायम वारणा पंचक्रोशीतील सांस्कृतीक, धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी असायच्या. वारणा भगिनी मंडळ व वारणा बझारच्या माध्यमातून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यात पुढाकार घेतला होता.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

शोभाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या, त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी वारणा नगर येथे त्यांचे निधन झाले.