News Flash

कोल्हापूर हद्दवाढीला विरोध; सात गावांमध्ये बंद

बंदला पूर्णत: प्रतिसाद

कोल्हापूर हद्दीवाढीच्या विरोधातील ग्रामीण भागातील जनतेचा रोष गुरुवारी पुन्हा प्रकटला. हद्दवाढीला विरोध करीत सात गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात १७ गावांतील ग्रामस्थ सातत्याने रस्त्यावर येत आहेत. या अंतर्गत गुरुवारी करवीर विधानसभा मतदारसंघाशी निगडित सात गावांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला पूर्णत: प्रतिसाद मिळाला. बािलगा, िशगणापूर, नागदेववाडी, आंबेवाडी, शिये, वडणगे, वाडीपीर या गावातील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. सकाळपासूनच दुकाने बंद राहिल्याने गावात शुकशुकाट जाणवत होता. नागरिक रस्त्यावर येऊन हद्दवाढीच्या विरोधात घोषणा देत होते.
शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन झाले. आमदार नरके, जिल्हा परिषद सदस्य एस आर. पाटील, बाजीराव पाटील, तालुका पंचायत सदस्य सरदार मिसाळ आदींनी गावोगावी जाऊन ग्रामस्थांच्या आंदोलनाला बळ दिले. २९ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असून, आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा नरके यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:30 am

Web Title: opposition to kolhapur limit increase strike in 7 villages
टॅग : Kolhapur,Strike
Next Stories
1 प्रसादाचे लाडू सेवाभाव मानणा-या भक्तांकडे देण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी
2 एकापेक्षा अधिक ठिकाणी जागा दिलेल्या फेरी विक्रेत्यांवर गंडांतर?
3 कृष्णराज महाडिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यासाठी सज्ज
Just Now!
X