कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यत ‘म्युकर मायकोसिस’ची ७ रुग्णांना लागण झाली असल्याचे गुरुवारी सूत्रांनी सांगितले. करोनातून बरे झालेल्या पण गंभीर आजार, मधुमेह असलेल्या रुग्णांना बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले.

करोना उपचारानंतर काही रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. करोनामुळे रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन, तसेच स्टिरॉइड्स औषधांमुळे हा आजार बळावतो. योग्य उपचार घेतल्यास संसर्ग नियंत्रणात आणता येणे शक्य आहे.  जिल्ह्यत याचा ७ रुग्णांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याची जिल्ह्यत काळजी घेतली जात असून  सरकारी, खासगी रुग्णालयांना कोणती काळजी घेतली पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दररोज आढावा घेतला जात असल्याचेही माळी म्हणाले.