िलगनूर (कापशी) (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीच्या सन २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षकि निवडणुकीत ग्रामविकास आघाडीतून नऊ पकी सात उमेदवार निवडून आले होते. त्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचासह सात जणांना सोमवारी अपात्र ठरविले.  पुढील पाच वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असा आदेशही दिला असून ग्रामपंचायतीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे सत्ताधारी मंडलिक गटाला मोठा धक्का बसला आहे.
िलगनुर (ता. कागल ) येथे २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये ग्रामविकास आघाडीतून सरपंच प्रमोद कुराडे, उपसरपंच अनिता आवळेकर, सदस्य अमित यादव, सरिता चेचर, भारती कांबळे, प्रमिला स्वामी, दादा पाटील हे सात जण निवडून आले होते. या पंचवार्षकि निवडणुकीमध्ये निवडणुकीचा हिशेब वेळेत न दिल्याने िलगनूर (कापशी) येथील संभाजी हरी यादव, राहूल नेताजी आवळेकर यांनी १ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडे तक्रार देऊन त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. तक्रारदारांच्यावतीने अॅड. सुरेश के. पाटील (करडय़ाळकर) यांनी काम पाहिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्याच्या आधारे या सात जणांना सोमवारी अपात्र ठरविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कागल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.