करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात रोज नवा वाद निर्माण होत बाहे. आता वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा बंदी लागू करण्यात आली आहे.

महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेबाबत काही निर्णय घेण्यात आले आहे. त्याचा फटका माध्यमांना बसत आहे. गुरुवारी महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमाकर्मींना रोखण्यात आले. कॅमेरा घेवून आता जाता येणार नाही असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यावर देवस्थान सचिव शिवराज नायकवडी यांनी मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले आहेत. कोणालाही कॅमेरा घेवून मंदिरात जाता येणार नाही. मंदिर प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने म्हटले आहे.

sandal paste on mahadev s pind in dhaneshwar temple
चिंचवडमध्ये प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप; अशी आहे आख्यायिका!
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून

कोल्हापूरचं अपवाद कसे?

गेल्या काही दिवसांपासून श्री महालक्ष्मी मूर्तीचा मुद्दा वादग्रस्त होत असल्याचे समोर आले आहे. यावरुन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. मात्र या निर्णयाचा फटका माध्यमांना बसला आहे. दुसरीकडे, मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोबाईल वापरण्यास मुभा आहे. त्याद्वारे छायाचित्रे , चित्रीकरण केले तर त्यास कोणी अटकाव करणार नाही. राज्यात कोणत्याच देवस्थानात माध्यमांना कॅमेरा सोबत नेण्यास, चित्रीकरण, छायाचित्रे काढण्याची सोय असताना कोल्हापूर मात्र त्यास अपवाद ठरल्याने त्याची चर्चा आहे.