अहमदनगरमध्ये निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून अजित पवार गटाकडून त्यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. अजित पवार यांच्याकडून तर जाहीर सभांमधून निलेश लंकेंवर टीका केली जात आहे. निलेश लंकेंना हरवायचंच असा जाहीर निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखवल्यानंतर आता निलेश लंके यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात निलेश लंके यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये अजित पवार यांचे आभार मानत खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध निलेश लंके असा हा सामना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

अजित पवारांचं जाहीर आव्हान

अजित पवार यांनी प्रचारसभांमधून निलेश लंके यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आधी अजित पवार गटात असणारे निलेश लंके शरद पवारांसोबत आल्यानंतर त्यांना नगरची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावर कधी खोचक तर कधी थेट शब्दांत टीका करायला सुरुवात केली. नुकतीच अजित पवारांनी नगरमध्ये घेतलेल्या एका प्रचारसभेत निलेश लंके यांना लक्ष्य करत परखड शब्दांत टीका केली.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
sharad pawar
“…तर केंद्रातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग”, शरद पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “प्रयत्नांची पराकाष्टा करून…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

“अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर धमक्या दिल्या, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझी अशी जिरवीन, की पुन्हा तु्ला सतत अजित पवारच डोळ्यांसमोर दिसेल. तू माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्याचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? तू काय समजतोस स्वत:ला?” असा सवाल अजित पवारांनी निलेश लंके यांना केला आहे.

“दमदाटी करणाऱ्यांना विनम्रपणे सांगायचंय की…”, सुप्रिया सुळेंचा टोला; अजित पवारांना प्रत्युत्तर!

निलेश लंके यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, निलेश लंकेंनी अजित पवार यांच्याच काही व्हिडीओ क्लिप एकत्र करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात अजित पवारांनी निलेश लंकेंबाबत पूर्वी केलेली विधानं आहेत. यामध्ये “निलेश लंके तर लंकाच पेटवत चाललाय सगळी. करोना जबरदस्त होता, निलेशनं स्वत: रुग्णांची मोठी व्यवस्था केली होती. या गड्याची अंगकाठी बारीक आहे, पण अक्षरश: कष्ट घेत होता”, असं अजित पवार बोलताना दिसत आहेत.

“२८८ आमदारांमध्ये जागरुक लोकप्रतिनिधी कसा असावा, असं विचारलं तर निलेश लंके हे उत्तम उदाहरण आहे. निलेश लंकेसारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. निलेश लंके आधुनिक श्रावणबाळ आहे”, असं अजित पवार म्हणत असल्याच्याही काही व्हिडीओ क्लिप्स या पोस्टमध्ये आहेत.

निलेश लंकेंची खोचक पोस्ट

या व्हिडीओसह लंके यांनी अजित पवारांना उद्देशून एक खोचक पोस्ट लिहिली आहे. “धन्यवाद दादा…तुम्ही माझ्याविषयी नगर दक्षिण मतदारसंघात येऊन कितीही आक्रमक बोललात, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारं हे खरं प्रेम कधीही कमी होणार नाही”, असं या पोस्टमध्ये निलेश लंके यांनी नमूद केलं आहे.