कोल्हापूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर पत्रकारास मारहाण केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पहाटे दाखल झाला. याप्रकरणी पत्रकार प्रकाश तीराळे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान राजेखान जमादार यांच्यावर या गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूर, इचलकरंजी मुरगुड यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा >>> निकालाआधीच हातकणंगलेत झळकले विजयी उमेदवाराच्या अभिनंदनचे बॅनर

Protest against Home Minister Amit Shah criticism of Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन
bjp-flag-759
पुण्यात आज भाजपचे अधिवेशन
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
bjp mp udayanraje Bhosale
अखेर भाजप कार्यालयात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र
Solapur, ransom, Municipal Health Officer,
सोलापूर : महापालिका आरोग्याधिकाऱ्यास दोन कोटींची मागितली खंडणी; प्रहार संघटनेच्या नेत्यासह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : आरोपी अंगरक्षकाच्या सहभागाचा दावा संशयास्पद, सत्र न्यायालयाचे मत
cases, MP, MLA, High Court,
खासदार, आमदारांच्या खटल्यांचा तपशील द्या, उच्च न्यायालयाचे सर्व जिल्ह्यांच्या प्रधान न्यायाधीशांना आदेश

तर,पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार याला अटक करावी , शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी , अशी मागणी मुरगुड येथील पत्रकारांनी केली. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली. बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. त्यांनी गणेश मंदिर चौकात मुरगूड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले.

हेही वाचा >>> कोल्हापूर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्याकडून पत्रकारास मारहाण

बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले. जमादार यांनी श्रीमुखात भडकवली. यानंतर तिराळे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल केला. कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जमादार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. गुंड प्रवृत्तीचे राजेखान जमादार यांच्यावर पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी केली.