कोल्हापूर : केंद्र शासनाने बुधवारी साखर कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या ‘इथेनॉल’च्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असून ही एकप्रकारे त्यांना दिवाळी भेट मिळाली आहे.

साखर कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या ‘इथेनॉल’च्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी साखर कारखान्यांकडून होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज अर्थविषयक समितीची बैठक झाली. त्यामध्ये २०२१-२२ या ऊस गळीत हंगामातील ‘इथेनॉल’ निर्मिती खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्यात ‘इथेनॉल’ची निर्मिती तीन पद्धतीने केली जाते. या तिन्ही प्रकारच्या ‘इथेनॉल’ खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

‘सी हेवी मोलॅसिस’ इथेनॉल खरेदी दर पूर्वी प्रति लिटर ४५ रुपये ६९ पैसे होता. आता तो ४६ रुपये ६६ पैसे झाला आहे. बी हेवी मोलॅसिस दर ५७ रुपये ६१ पैसे होता; तो आता ५९ रुपये ८ पैसे झाला आहे. तर साखर रसापासून (शुगर सिरप) इथेनॉल खरेदी दर ६२ रुपये ६५ पैसे वरून ६३ रुपये ४५ पैसे करण्यात आला आहे.

आता इंधनामध्ये २० टक्के ‘इथेनॉल’

भारतात पेट्रोल डिझेल इंधन आयात करण्यासाठी अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्च करावे लागते. इंधनामध्ये ‘इथेनॉल’ मिश्रण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१५ पर्यंत १० टक्के मिश्रण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यामध्ये बदल करून २० टक्के मिश्रण करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ८ टक्के मिश्रण होत होते. केंद्र सरकारने १५०० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे लक्ष ठेवले आहे, असे मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले.