कोल्हापूर : उत्तम प्रतीच्या चवीमुळे गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. विशेष म्हणजे आता, गोकुळचे गायीचे तूप आता मुंबई येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे.

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळचे वाहन तुप घेऊन मुंबईकडे जात असताना त्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. १ एप्रिल ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासाठी ‘गोकुळ’चे तूप वापरले जाणार असून हे आमचगे भाग्य आहे, अशा भावना , डोंगळे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा…कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस

संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सचिव प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, विपणन महा.व्यवस्थापक जगदीश पाटील उपस्थित होते.