कोल्हापूर : कोल्हापूर परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. राष्ट्रीय महामार्ग खालून जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागला. तर जिल्ह्यात विजांच्या कडकड्यासह पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता कायम आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत उन्हाच्या झळा किंचित सह्य झाल्या आहेत. तरीही अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

हेही वाचा…कोल्हापूर शिवसेनाप्रमुख राजेखान जमादार अटक कारवाईसाठी पत्रकारांची निदर्शने

आज सकाळपासून मध्ये मध्ये ढग येत होते. थेट उन्हाचा मारा होण्यापासून तितकीच सुटका होत राहिली. दुपारनंतर टोप, संभापूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. याच भागातून पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. महामार्गाच्या पुलाखाली ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. कोल्हापूर शहरात पावसाने तुरळक हजेरी लावली.

हेही वाचा…निकालाआधीच हातकणंगलेत झळकले विजयी उमेदवाराच्या अभिनंदनचे बॅनर

जिल्ह्यात सुमारे ४० किमी प्रति तास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सायंकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall hits kolhapur causes waterlogging and traffic disruptions on national highway psg