इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्वाश्रमीतील मुंबई येथील मनचेकर टोळीतील गँगस्टर याला रविवारी जेरबंद केले. शशिकांत महादेव बिर्जे (वय ३५, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, चार जिवंत राऊंड आणि दुचाकी असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या बाबत पोलिसांनी असे सांगितले, की पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार शशिकांत बिर्जे यांचेकडे गावठी पिस्तूल व राउंड बाळगून आहे, अशी माहिती मिळाल्यावरून आज दुपारी दीड वाजता कोल्हापूर रस्त्यावरील कबनूर ओढ्यावर गस्त घालत असता बिर्जे हा मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांचेकडे एक पिस्तूल सापडले. त्यावरून पोलिसांनी बिर्जे याला अटक केली.  दरम्यान, बिर्जे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे मुंबई, डोंबिवली, आंबरनाथ या ठिकाणी दाखल आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, महेश कोरे, वैभव दद्दीकर, विजय तळस्कर, रवी कोळी, सागर पाटील आदींनी केली.

Actor Salman Khan, Look out circular,
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी
job opportunities
नोकरीची संधी: भारतीय लष्करातील संधी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले