महालक्ष्मी मंदिराच्या गाभारा प्रवेश मारहाणीच्या घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशानंतर एका समितीमार्फत या घटनेची चौकशी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
बुधवारी रात्री भूमाता संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यानंतर संतप्त भाविकांनी देसाई यांना मारहाण केली. या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अमित सनी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशानंतर समितीचे गठन होणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाविकांनी केलेल्या मारहाणप्रकरणी प्रशासनास दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. दोन दिवसांत प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आपण तक्रार दाखल करू, असे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुरुवारी सकाळी देसाई यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापुरातील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री राम िशदे यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.