scorecardresearch

Premium

मटन खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या रांगा; भाऊबीज झणझणीत होणार

आज भाऊबीज च्या निमित्ताने कोल्हापूरकरांना मटण खाण्याचे वेध लागले आहेत.

Queues in Kolhapur to buy mutton on bhaubij
सकाळपासूनच कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये मटण खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

कोल्हापूर: कोल्हापूर म्हटले की मटण तांबडा पांढरा रस्सा डोळ्यासमोर हमखासपणे येतोच गेले काही दिवस दिवाळीचे दिवाळी फराळाचे गोड गोड खाण्याची चंगळ सुरू होती. पण आज भाऊबीज च्या निमित्ताने कोल्हापूरकरांना मटण खाण्याचे वेध लागले आहेत. यामुळे सकाळपासूनच कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये मटण खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा. झणझणीत आणि चविष्ट जेवणासाठी देखील कोल्हापूर देशभरात प्रसिद्ध आहे. मांसाहारी खवय्यांसाठी कोल्हापूर म्हणजे खायची चंगळ. कोल्हापूरला जाणारा प्रत्येकजण तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव मारण्यासोबतच इतर मांसाहारी पदार्थांची मज्जा लूटत असतो.

Maratha reservation
मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापुरात अमदारांच्या घरांसमोर आक्रोश
सोलापूर : गणपतराव देशमुखांच्या नातवांचे पार्सल पेनूरला परत पाठवू, आमदार शहाजीबापू पाटील यांची गर्जना
conflict between two factions of shiv sena during ambadas danve kolhapur visit
कोल्हापूर: अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष शिगेला
lalit kala kendra ram leela pune marathi news, pune ram leela controversy marathi news
पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

आणखी वाचा-पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार, खासदारांना बहिणींकडून खर्डा भाकरीची भाऊबीज, ऐन दिवाळीत महिला रस्त्यावर

दिवाळी फराळ गोडधोड पदार्थावर ताव मारल्यानंतर आता कोल्हापूरकरांना भाऊबीज निमित्त मटणाची लज्जत चाखायची आहे. यामुळे आज सकाळपासून मटन मार्केट समोर खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर प्रमाणे ग्रामीण भागातील मटण खरेदीसाठी असेच चित्र दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Queues in kolhapur to buy mutton on bhaubij mrj

First published on: 15-11-2023 at 11:21 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×