कोल्हापूर: ज्येष्ठ बालसाहित्य शाम कुरळे हे बेपत्ता झाले आहेत. पोलीस, नातेवाईक यांच्याकडून त्यांचा शोध सुरू आहे.आपटे नगर परिसरात राहणारे ८१ वर्षीय कुरळे हे शनिवारी नित्याच्या वस्तू आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. पण त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. अलीकडे त्यांना स्मृतीभ्रंशाचा   त्रास होत आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये  कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

गेली दोन-तीन दिवस कोल्हापूर परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. काल ते नागाळा पार्क भागात एका माजी विद्यार्थिनी तसेच फळ विक्रेत्यास दिसले होते. या फळ विक्रेत्यांनी कुरळे सरांना रस्ता ओलांडण्यास मदत केली होती. पण त्यांना ते बेपत्ता झाल्याची माहिती नव्हते.

हेही वाचा >>>“…तर रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार”, सतेज पाटील यांचा इशारा

मंगळवारी कसबा बावडा परिसरात त्यांना पाहिल्याचे काहींनी मुलगा प्रशांत यांना सांगितल्याने या भागात शोध घेण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, काही पोलीस शोध घेत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे मागोवा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.