कोल्हापूर : पोटाच्या पोरीला एक लाख रुपयांना विकणाऱ्या आईसह तिघांना आज कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. पुनम दिलीप ढेंगे (वय २५.रा. नवीन वसाहत, इंगळी ) असे या महिलेचे नाव आहे. तिने गोवा येथील वास्तव्यास असलेल्या फर्नांडिस आणि जेरी नोरोन्हा यांना एक लाखाला विकल्याची कबुली आज पोलिसांना दिली आहे आहे.

पोलिसांनी पुनम दिलीप ढेंगे, सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय ४०.रा. शहापूर बालाजीनगर, इंचल), किरण गणपती पाटील (वय.३०.रा. केर्ली, ता.करवीर), श्रीमती फातीमा फर्नांडिस आणि जेरी पॉल नोरोन्हा (वय ४४, दोघे रा.२४३ चर्च जवळ न्युरा, उत्तर गोवा). यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पीडीत मुलीच्या आईसह तिघांना ताब्यात घेतले आहे. हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे रहात असलेले दिलीप आणि पूनम यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी आहे.पती आणि पत्नीत गेल्या एक वर्षा पासून कौटुंबिक वाद आहे.

आणखी वाचा-शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती

पुनम ही आपल्या लहान मुलीसह माहेरी आपल्या आईकडे रहात होती. २७ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात घरी कोणाला न सांगता पूनम हिने आपल्या मित्रांच्या मदतीने गोवा वास्तव्यास असलेल्या फातीमा फर्नाडिस आणि जेरी नोरोन्हा यांना मुलीला एक लाखांत विकल्याची घटना घडली आहे.

याची माहिती तिचा पती दिलीप ढ़ेंगे यांना समजताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी या सर्वावर गुन्हा दाखल केला. मुलीच्या शोधासाठी गोवा येथे पोलिस पथक रवाना झाले.या गुन्हयाचा तपास लक्ष्मीपुरीचे महिला सहा.पो.नि.रुपाली पाटील करीत आहेत.