सलामीच्या लढतीत ग्रीसवर मात केल्यानंतर आता आयव्हरी कोस्टचा सामना करण्यासाठी कोलंबियाचा संघ सज्ज झाला आहे. आशिया खंडातला मातब्बर संघ असणाऱ्या जपानला नमवत आयव्हरी कोस्टने खळबळजनक विजयाची नोंद केली होती. या लढतीत लौकिलाला साजेसा खेळ करत बाद फेरीत आगेकूच करण्याचा कोलंबियाचा इरादा आहे.
दुसरीकडे जपानपाठोपाठ आणखी एका दणदणीत विजयासाठी आयव्हरी कोस्टची तयारी सुरू आहे. आयव्हरी कोस्टचा संघ शारीरिकदृष्टय़ा ताकदवान संघ आहे. शक्तीपूर्ण खेळाद्वारे जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र पासेस आणि कौशल्याच्या बाबतीत आम्ही आघाडीवर असल्याचे कोलंबियाचा मध्यरक्षक फ्रेडी गुआरिनने सांगितले. दिदिएर ड्रोग्बा आणि याया टौरू यांच्यावर कोलंबियाची भिस्त आहे. २००६ आणि २०१०मध्ये आयव्हरी कोस्टला प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र चांगली सुरुवात वाया जाऊ द्यायची नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे.
सामना क्र. २१
‘क’ गट : कोलंबिया वि. आयव्हरी कोस्ट
स्थळ :  एरिना इस्टाडिओ, ब्राझिलिया
सामन्याची वेळ : रात्री ९.३० वा