News Flash

भारताचे बॉक्सिंग त्रिरत्न अंतिम फेरीत दाखल

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या तीन युवा बॉक्सर स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगने ४९

| July 8, 2013 01:07 am

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा  
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या तीन युवा बॉक्सर स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगने ४९ किलो वजनीगटात, शिवा थापाने ५६ किलो वजनी गटात आणि मनदीप जांग्राने ६९ किलो वजनीगटात तडफदार खेळीकरत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंचे रौप्य पदक पक्के झाले आहे आणि तिन्ही खेळाडू सुवर्णपदाचे मानकरी ठरतील अशी आशा रसिकांकडून व्यक्त केली जात आहे.     
आशियाई स्पर्धेच्या माध्यामातून देवेंद्रो सिंगने त्याच्या बॉक्सिंग करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवघ्या २१ वर्षीय देवेंद्रोने स्पर्धेत सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी केली आणि विजय प्राप्त करत अंतिम फेरी गाठली आहे. देवेंद्रोची आशियाई स्पर्धेतील कामगिरी वाखाडण्याजोगी आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 1:07 am

Web Title: 3 indians in asian boxing championships finals
Next Stories
1 कॅप्टन कूल धोनीचा वाढदिवस
2 अ‍ॅशेसच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघात कॉम्पटनला वगळले
3 पदक जिंका आणि नागरिकत्व मिळवा! आखाती देशांचा नवा कानमंत्र
Just Now!
X