ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना दमदार शतक झळकावलं आहे. संथ सुरुवात करणाऱ्या फिंचनं नंतर भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. फिंचन १२४ चेंडूत संयमी ११४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान फिंचनं दोन षटकार आणि ९ चौकार लगावलं. फिंचनं वॉर्नरसोबत १५६ धावांची तर स्मिथसोबत १०८ धावांची भागिदारी केली.

अॅरोन फिंचनं कर्णधाराला साजेशी खेळी करत ऑस्ट्रेलियाची सन्माजनक धावसंख्साकडे आगेकूच केली आहे. स्मिथनं संथ सुरुवात केल्यानंतर भारतीय गोलंदाजाची पिसे काढली आहे. या खेळीदरम्यान स्मिथनं दोन उतुंग षटकार लगावले आहेत. फिंचनं आज सतरावं शतक झळकावलं आहे. फिंचं हे भारताविरोधातील चौथं शतकं आहे.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजामध्ये फिंचनं गिलख्रिसटला मागे टाकलं आहे. या यादीत पॉटिंग अव्वल क्रमाकावर असून त्याच्या नावावर २९ शतकांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर वॉर्नर आणि मायकल वॉ आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी १८ शतकांची नोंद आहे. चौथ्या क्रमांकावर फिंच असून त्याच्या नावावर १७ शतकांची नोंद आहे.

फिंचनं ओलांडला पाच हजार धावांचा टप्पा –
कर्णधार अॅरोन आरोन फिंचने १२६ व्या डावांत पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वेगवान पाच हजार धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये फिंच दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नरनं ११५ डावांत पाच हजार धावांचा टप्पा पार केला होता. तिसऱ्या क्रमांकावर डीन जोन्स असून त्यांनी १२८ डावांत हा टप्पा पार केला होता.