News Flash

आनंदने करूआनाला बरोबरीत रोखले

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने झुरिच बुद्धिबळ स्पध्रेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या फॅबियानो करूआना याला बरोबरीत रोखले. व्लादिमिर क्रामनिक (रशिया) आणि बोरिस गेलफंड (इस्रायल) यांच्यातील दुसरी लढतसुद्धा बरोबरीत

| February 25, 2013 02:20 am

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने झुरिच बुद्धिबळ स्पध्रेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या फॅबियानो करूआना याला बरोबरीत रोखले. व्लादिमिर क्रामनिक (रशिया) आणि बोरिस गेलफंड (इस्रायल) यांच्यातील दुसरी लढतसुद्धा बरोबरीत सुटली. त्यामुळे पहिल्या फेरीअखेर चारही स्पर्धक प्रत्येकी अध्र्या गुणांसह संयुक्तपणे समान स्थानावर आहेत.या वर्षांतील तिसऱ्या ‘सुपर’ स्पध्रेत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने प्रारंभी चांगली आघाडी घेतली होती. आनंदने सिसिलियन नॅजडॉर्फ पद्धतीने डाव रचला. परंतु अखेर फॅबियानोने लढत बरोबरीत सोडविण्याचा प्रस्ताव मान्य केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:20 am

Web Title: anand hold equally to fabiano caruana
टॅग : Sports
Next Stories
1 बार्सिलोना आघाडीवर
2 भारताची रशियावर मात; तिसऱ्या फेरीत प्रवेश
3 वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेवर काही राज्यांच्या बहिष्काराचे सावट?
Just Now!
X