मिनी ऑलिम्पिक अशी ओळख असणाऱ्या एशियाड स्पर्धेला आजपासून इंडोनेशियाच्या जकार्ता येथे सुरुवात होणार आहे. १८ ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून या स्पर्धेच्या स्वागत सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय पुरुष आणि महिलांचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

अवश्य वाचा – Asian Games 2018 : जाणून घ्या एशियाडच्या सामन्यांची वेळ, तारीख, कोणत्या वाहिनीवर पाहाल सामन्यांचं प्रक्षेपण

एशियाड पुरुष संघांची गटवारी –

अ गट : भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, थायलंड, श्रीलंका
ब गट : इराण, पाकिस्तान, इंडोनेशिया, जपान, नेपाळ, मलेशिया

एशियाड महिला संघांची गटवारी –

अ गट : भारत, थायलंड, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया
ब गट : इराण, बांगलादेश, दक्षिण कोरिया, चीन तैपेई

—————————————————————————————————

भारतीय संघांचे एशियाड २०१८ चे वेळापत्रक –

१९ ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध जपान (महिला) – सकाळी साडेसात वाजता
भारत विरुद्ध बांगलादेश (पुरुष) – दुपारी साडेबारा वाजता
भारत विरुद्ध श्रीलंका (पुरुष) – संध्याकाळी साडेपाच वाजता

२० ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध थायलंड (महिला) – सकाळी ९ वाजून १० मिनीटांनी
भारत विरुद्ध दक्षिण कोरिया (पुरुष) – दुपारी अडीच वाजता वाजता

२१ ऑगस्ट २०१८ :

भारत विरुद्ध श्रीलंका (महिला) – सकाळी साडेसात वाजता
भारत विरुद्ध इंडोनेशिया (महिला) – सकाळी १० वाजून ५० मिनीटांनी
भारत विरुद्ध थायलंड (पुरुष) – दुपारी साडेतीन वाजता