Akash Chopra Angry on Fake News of Rohit Sharma: आयपीएल सुरू असतानाच नुकताच टी-२० विश्वचषकासाठीचा संघ घोषित करण्यात आला. यावर अनेक क्रिकेट दिग्गज आणि माजी खेळाडूंनीही वक्तव्य केली. पण यादरम्यान आकाश चोप्राच्या व्हायरल होत असलेल्या वक्तव्याने लक्ष वेधले. पण हे वक्तव्य खोटे असल्याने माजी भारतीय क्रिकेट आणि समालोचक आकाश चोप्रा चांगलाच वैतागला. सोशल मीडियावर आकाश चोप्राच्या नावाने चुकीची बातमी पसरवली जात होती. आता आकाश चोप्राने या फेक न्यूजवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“रोहित शर्माची टी-२० विश्वचषक संघात निवड व्हायला नको होती. आता तर तो पॉवरप्लेमध्येही अपयशी ठरत आहे.” आणि खाली आकाश चोप्राचे नाव देत हे वक्तव्य व्हायरल होत होते. या फेक न्यूजला उत्तर देताना आकाश चोप्राने लिहिले, “एकमेकांबद्दल कटुता आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी आयपीएलचा कालावधी ही योग्य वेळ असते आणि अशा प्रकारचा मूर्खपणा करण्याचीही आणि चाहते तर अशा गोष्टी उचलून धरण्यासाठी नेहमीच तयार असते.मला कधी कधी आश्चर्य वाटते की व्ह्यूज नैतिकतेपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का.” आकाश चोप्राने या पोस्टमध्ये खाली फेक न्यूज पसरवणाऱ्या त्या पेजचा फोटोही पोस्ट केला आहे.

Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Michael Clark Statement on Hardik Pandya Selection in Team India and Hails Captain Rohit Sharma
“…तर रोहितने टी-२० वर्ल्डकप संघात पंड्याची निवड होऊच दिली नसती”, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Mumbai Indians Toss Controversy Hardik Pandya Threw Coin Very High
मुंबई इंडियन्सच्या सामन्यात पुन्हा नाणेफेकीचा वाद पेटला; Video पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले, “सगळं विकत..”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Hardik Pandya Statement on MI defeat to KKR
IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?
Raj and uddhav
राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (३० एप्रिल) टी-२० विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. घोषणेनंतर, अनेकांनी संघ निवडीवर आपली मते मांडली आहेत. मात्र, काही लोकांनी या निवडीवर टीकाही केली. या टीकेदरम्यान आकाश चोप्राच्या नावाने चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या.

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू: शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंग आणि आवेश खान.