News Flash

रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात

सहा धावांनी मात करून मालिकेत ४-० ने आघाडी; पाकिस्तानच्या दोन फलंदाजांची शतके व्यर्थ

सलामीवीर अबिद अली व यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी दमदार शतके झळकावूनदेखील पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. शनिवारी रात्री झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ग्लेन मॅक्सवेलची झंझावाती खेळी व गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहा धावांनी पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दिलेले २७८ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानला निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली असून मालिकेतील पाचवा सामना रविवारी रंगणार आहे. ग्लेन मॅक्सवेलने ८२ चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांसह झुंजार ९८ धावांची खेळी साकारली. त्याला उस्मान ख्वाजा (६२) व अ‍ॅलेक्स करी (५५) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत आठ फलंदाजांच्या मोबदल्यात २७७ धावांपर्यंत मजल मारता आली.

प्रत्युत्तरात अली (११२) व रिझवान (१०४) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १४४ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानला पहिल्या विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र अ‍ॅडम झम्पा व मार्कस स्टोयनिसने अनुक्रमे अली व रिझवानला बाद करत पाकिस्तानच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. ९८ धावा करणाऱ्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ८ बाद २७७ (ग्लेन मॅक्सवेल ९८, उस्मान ख्वाजा ६२; इमाद वासिम २/५६) विजयी वि.
  • पाकिस्तान : ५० षटकांत ८ बाद २७१ (अबिद अली ११२, मोहम्मद रिझवान १०४; नॅथन कुल्टर नाईल ३/५३).
  • सामनावीर : ग्लेन मॅक्सवेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 6:55 am

Web Title: australia won over pakistan in nail biting finish in 4th odi as maxwell shines
Next Stories
1 चेन्नई-राजस्थान संघांपुढे चेपॉकच्या खेळपट्टीचे आव्हान
2 पहिल्या विजयाची बेंगळूरुला उत्सुकता!
3 मक्तेदारी टिकवण्याचे महाराष्ट्रापुढे आव्हान!
Just Now!
X