News Flash

ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू अडकणार लग्नाच्या बेडीत

ऑस्ट्रेलियान कर्णधार स्टिव्ह स्मिथ अडकणार लग्नाच्या बेडीत

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आपली ५ वर्ष जुनी सहकारी डॅनी विल्स सोबत स्टिव्हचा साखरपुडा नुकताच पार पडलाय. स्टिव्ह स्मिथने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन साखरपुड्याचे काही खास फोटोग्राफ शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे.

3

स्टिव्हची बायको डॅनी विल्स ही एक जलतरणपटू असुन ती वॉटर पोलो खेळाडू आहे. गेले काही वर्ष डॅनी स्टिव्ह स्मिथसोबत क्रिकेटच्या प्रत्येक दौऱ्यावर जात आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेण्यापासून, त्याच्या चांगल्या-वाईट दिवसांमध्ये डॅनीने त्याची साथ सोडली नाही. अखेर आज दोघांनीही आपलं ५ वर्षांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करुन आज आपला साखरपुडा केला आहे. डॅनी सध्या सिडनीच्या मॅक्वायर विद्यापीठात व्यापारविषयक कायद्यांचं शिक्षण घेत आहे.

2

२०१४-१५ साली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान डॅनी विल्सने विराट कोहलीचीही भेट घेतली होती. याचसोबत भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान डॅनी डेव्हिड वॉर्नरची बायको कँडीक वॉर्नरसोबत प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये दिसली होती.

1

स्टिव्ह स्मिथचा पहिला आंतराष्ट्रीय सामना, अॅशेस मालिका, न्यूझीलंड दौरा, बीग बॅश लीग सारख्या प्रत्येक स्पर्धेत डॅनी स्टिव्ह स्मिथच्या सावलीसारखी वावरत होती. याविषयी एकदा स्मिथची प्रतिक्रीया विचारली असता स्मिथ म्हणाला, ” डॅनी मला नेहमी चांगला आणि योग्य सल्ला देते. त्यामुळे असा सल्ला देणारी व्यक्ती आपल्या घरी कायमची असावी असं कोणाला वाटत नसेल.”

त्यामुळे आगामी काळात स्मिथ मैदानात कशी कामगिरी करतो याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:00 pm

Web Title: australian captain steve smith engaged to his girlfriend dani wills
Next Stories
1 Video: बरं झालं कुकने ‘तो’ झेल पकडला, नाहीतर…
2 जेव्हा ‘सर जाडेजा’ नरेंद्र मोदींची नक्कल करतात
3 दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघाची निवड, ‘या’ मुंबईकर खेळाडूंचा संघात समावेश
Just Now!
X