पर्थ : चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यानंतर वर्षभराची बंदी लादण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरून बँक्रॉफ्टला स्थानिक स्तरावरील सामने खेळण्यास मंजुरी दिली आहे.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनला झालेल्या सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर यांच्या निर्देशानुसार बँक्रॉफ्टने चेंडूला घर्षणकागदाने घासून त्याच्या आकारात काही फेरफार करण्याचे प्रयास केले होते. हा संपूर्ण प्रकार सामन्याचे चित्रीकरण करणाऱ्या एका कॅमेऱ्यात बंदीस्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची मखलाशी उघडकीस आली होती. या घटनेने ऑस्ट्रेलिया संघावर मोठी नामुष्कीची वेळ आल्यानंतर घटनेशी संबंधित स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट या तिघांवर वर्षभराची बंदी लादण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर झालेल्या घडामोडींमध्ये ही बंदी असूनही त्याला

स्थानिक स्तरावर खेळण्यासाठीची बंदी मात्र उठविण्यात आली आहे.