02 March 2021

News Flash

भारताला नमवणे अ‍ॅशेसपेक्षा महत्त्वाचे!

ऑस्ट्रेलियाचा दर्जा घसरण्याचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्वान यांचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लंडचा भारत दौरा

ऑस्ट्रेलियाचा संघ आता जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून गणला जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने नमवल्यास ते अ‍ॅशेस विजयापेक्षाही महत्त्वाचे ठरेल, असे आवाहन इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यांनी केले आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ५ फेब्रुवारीपासून क्रिकेट सामने खेळणार आहे. यात चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली अनुपलब्ध असतानाही भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे स्वान यांनी भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. ‘‘जागतिक क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा संघ तेवढा बलाढय़ संघ मानला जात नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला अ‍ॅशेस मालिकेपेक्षा भारताविरुद्धच्या सामन्यांची उत्सुकता असते,’’ असे स्वान म्हणाले.

‘‘अ‍ॅशेस मालिकेची उत्कंठा आता इतिहासजमा झाली आहे. भारताला त्यांच्या देशात नमवणे, हे कौतुकास्पद यश असेल. २०१२मध्ये आम्ही भारताला त्यांच्या देशात नमवण्याची किमया साधली होती. तेव्हापासून मायदेशात ते अपराजित राहिले आहेत. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती हेच इंग्लंडपुढील आव्हान असेल,’’ असे स्वान यांनी सांगितले. ४१ वर्षीय ऑफ-स्पिनर स्वानने २००८ ते २०१३ या कालावधीतील ६० कसोटी सामन्यांत २५५ बळी मिळवले आहेत.

‘‘इंग्लंडच्या संघाने मागील चुकांमधून धडे घ्यावे. २०१२च्या भारत दौऱ्यावर केव्हिन पीटरसनने फिरकीचा अप्रतिम उपयोग करून ते यश मिळवले होते. त्याचा योग्य अभ्यास केल्यास इंग्लंडला भारत दौरा यशस्वी करता येऊ शकेल,’’ असे स्वान यांनी सांगितले.

‘‘पीटरसनने फिरकीविरुद्ध खेळण्याचा इंग्लंडचा दृष्टिकोन बदलला. तो अतिआक्रमक कर्णधार होता. तसेच तंत्रशुद्ध फलंदाजी हे त्याचे वैशिष्टय़ होते,’’ असेही स्वान यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:18 am

Web Title: bending india is more important than ashes grammy swan abn 97
Next Stories
1 सिंधू, समीरचे आव्हान संपुष्टात
2 टोक्यो ऑलिम्पिक रद्द होण्याची अफवा बाख यांनी फेटाळली
3 लसीच्या अनिश्चिततेमुळे ऑलिम्पिकबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X