News Flash

सट्टेबाजांनी चंडिलाला ४९ लाख दिले – दिल्ली पोलीस

सट्टेबाजांनी अजित चंडिलाला यंदाच्या आयपीएल मोसमातील स्पॉट-फिक्सिंगसाठी ४९ लाख रुपये दिले होते, त्यामधील १५ लाख रुपये चंडिलाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी दिले होते, पण या सामन्यापूर्वीच

| May 23, 2013 03:04 am

सट्टेबाजांनी चंडिलाला ४९ लाख दिले – दिल्ली पोलीस

सट्टेबाजांनी अजित चंडिलाला यंदाच्या आयपीएल मोसमातील स्पॉट-फिक्सिंगसाठी ४९ लाख रुपये दिले होते, त्यामधील १५ लाख रुपये चंडिलाला सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी दिले होते, पण या सामन्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली, अशी महिती दिल्ली पोलिसांनी बुधवारच्या तपासानंतर दिली आहे.
पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुकी सुनील भाटिया याने बांगलादेश प्रीमिअर लीग (बीपीएल) आणि इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) या स्पर्धामधील सामने निश्चित केले होते.
एस. श्रीशांत, चंडिला आणि अंकित चव्हाण यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून काही बुकींची नावे पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सट्टेबाजांनी राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामना निश्चित करण्यासाठी सांगितले होते व त्याने ते मान्यही केले होते. सट्टेबाजांनी ५, ९, १२ आणि १३ मेच्या सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंग करायचे ठरवले होते. पण त्यामधील १२ मेच्या सामन्यात स्पॉट-फिक्सिंग करण्यात आली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडिला याला ५ मेच्या सामन्यासाठी २५ लाख आणि १७ मेच्या सामन्यासाठी १७ लाख रुपये देण्यात आले होते. त्याचबरोबर एका अन्य सट्टेबाजाकडून त्याला ९ लाख रुपये मिळाले होते. आपल्या दुसऱ्या षटकात ठरावीक इशारा न केल्याने २५ लाखांमधून चंडिलाला २० लाख रुपये परत करावे लागले होते.
पटियाला येथील मालमत्ता दलाल दीपक कुमार याच्याकडून चंडिलाला १५ लाख रुपये देण्यात आले होते. कुमारने खेळाडू निश्चित करण्यासाठी सट्टेबाजांशी संपर्क केला होता आणि सट्टेबाजांनी चंडिला हे काम करेल, असे कुमारला सांगितले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडिला कुमारचे काम करण्यासाठी तयार झाला होता. पण काही कारणास्तव यामध्ये वेळ लागत होता, अखेर १७ मेच्या सामन्यात हे काम करण्याचे ठरले होते, त्यासाठी एप्रिलमध्येच त्याने १५ लाख रुपये आगाऊ घेतले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाज सुनील भाटिया आणि माजी रणजीपटू बाबूराव यादव यांनी बीपीएलचे सामने निश्चित केले होते. २००७ मध्ये आयसीएलचे सामने निश्चत करण्यासाठीही ते प्रयत्नशील होते. सट्टेबाजाने आयसीएलमधील सामने निश्चित केल्याचे मान्यही केले आहे. आयसीएल बंद झाल्यावर बाबूराव यादव कोलकाता संघात दाखल झाला होता, त्यावेळी त्याला दोन-तीन हजार रुपये मिळत होते. त्यावेळी भाटियाने बाबूरावला बीपीएलमधील खेळाडूंशी संपर्क साधून सामना निश्चित करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर हे दोघेही बांगलादेशमध्ये गेले होते. भाटिया हा सट्टेबाज म्हणून कुप्रसिद्ध असल्याने आयसीसीचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथक त्याच्या मागावर होते, हे जेव्हा भाटियाला समजले तेव्हा तो भारतात निघून आला.
खेळाडूंचा आणि सट्टेबाजांचा थेट संपर्क आला होता का, असे विचारल्यावर अधिकारी म्हणाले की, सुरुवातीला सट्टेबाज जिजू जनार्दन आणि अमित सिंग यांच्याशी संपर्क साधायचे. पण कालांतराने खेळाडू आणि सट्टेबाज यांच्यामध्ये संपर्क
व्हायचा.
श्रीशांत याच्याविरोधातील पुराव्यांबद्दल विचारले असता, अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीशांतविरोधात ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्यामधील संवादाचे सीसीटीव्ही चित्रीकरण आमच्या हाती लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 3:04 am

Web Title: chandila received rs 49 lakh from bookies
टॅग : Spot Fixing
Next Stories
1 सट्टा कंपनी चालवण्याचा श्रीशांतच्या कंपनीचा विचार होता
2 श्रीशांतबद्दल आता बोलणे उचित नाही – केसीए
3 सट्टेबाजांना पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाचा नकार
Just Now!
X