दक्षिण कोरियामधील इनचॉन येथे २९ जून ते ४ जुलैदरम्यान होणाऱ्या चौथ्या आशियाई इनडोअर कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दीपिका जोसेफ आणि अभिलाषा म्हात्रे या सुवर्णकन्यांनी भारताच्या महिला संघात स्थान मिळवले आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघ जाहीर झाले असून पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आले नाही.
या स्पर्धेत महिला कबड्डीला पहिल्यांदाच स्थान देण्यात आले असून दीपिका (पुणे) आणि अभिलाषा (मुंबई उपनगर) या दोघींची सात जणांच्या संघात निवड झाली आहे. पुरुषांच्या सराव शिबिरासाठी नितीन मदने आणि काशिलिंग आडके (सांगली) तसेच सचिन खांबे (रत्नागिरी) यांना निवडण्यात आले होते. मात्र यापैकी एकही खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. भारतीय संघ : पुरुष- राकेश कुमार (कर्णधार), अनुप कुमार, अजय ठाकूर, समरजीत, जसवीर सिंग, सतीश, सुरजीत सिंग, प्रशिक्षक : बलवान सिंग. महिला- तेजस्विनी बाई (कर्णधार), ममता, दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे, कविता, प्रियंका, सुमन. प्रशिक्षिका : सुनील दबास.