News Flash

कसोटीनंतर क्रिकेट चाहत्यांना आता वन-डे क्रिकेटची पर्वणी

इंग्लंड-आयर्लंडमध्ये रंगणार ३ सामन्यांची मालिका, इंग्लंडच्या संघाची घोषणा

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद होते. परंतू आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने अखेरीस सामन्यांना मान्यता दिली. ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. यानंतर क्रिकेटप्रेमींना आता वन-डे सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. ३० जुलैपासून इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका रंगणार आहे. लॉकडाउनपश्चात खेळवला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असणार आहे.

३० जुलै, १ आणि ४ ऑगस्ट रोजी हे सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनकडेच संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी असा असेल इंग्लंडचा संघ –

इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बँटन, सॅम बिलिंग्स, टॉम करन, लिआम ड्वासन, जो डेनली, साकीब महमूद, आदिल रशिद, जेसन रॉय, रीस टोपले, जेम्स विन्स, डेव्हिड विली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:52 pm

Web Title: england name a 14 man squad for their three match odi series against ireland psd 91
Next Stories
1 ENG vs WI : कर्णधार रूटची दमदार खेळी; स्मिथला मागे टाकत मियाँदादच्या विक्रमाशी बरोबरी
2 स्टुअर्ट ब्रॉडचा विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
3 2008 Sydney Test : तुम्ही एकदा नाही, सातवेळा चुकलात ! भारतीय खेळाडूने बकनरला सुनावलं
Just Now!
X