जपान आणि ग्रीस यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने हा सामना म्हणजे अखेरची संधी ठरू शकते. जपानला पहिल्या सामन्यात आयव्हरी कोस्टने २-१ असे पराभूत केले होते, तर कोलंबियाने ग्रीसचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल.
पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी जरी जपानने आशा सोडलेली नाही. विश्वचषकात त्यांना आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी या सामन्यात नव्याने सुरुवात करण्यासाठी ते सज्ज असतील.
ग्रीसला पहिल्या सामन्यात एकही गोल करता आला नव्हता, तर प्रतिस्पर्धी कोलंबियाने त्यांच्यावर तीन गोल केले होते. त्यामुळे बचाव आणि आक्रमण या दोन्ही गोष्टींवर ग्रीसला मेहनत घ्यावी लागणार आहे.
सामना क्र. २२
‘क’ गट : जपान वि. ग्रीस
स्थळ :   ईस्टाडिओ डास डुनास, नाताल
सामन्याची वेळ :  (२० जून) पहाटे ३.३० वा.