करोनानंतर सुमारे चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियलने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. या सामन्यात अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. पण सध्या मात्र एका वेगळ्या सामन्यातील रन-आऊटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा बड्या लीग सामन्यांच्या नाही. हा व्हिडीओ एका स्थानिक टेनिस क्रिकेट सामन्याचा आहे. अनेक ठिकाणी टेनिसच्या चेंडूने क्रिकेटचे सामने भरवले जातात. त्यातीलच एका सामन्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Dost Dost Na Raha… #feelkaroreelkaro #feelitreelit

A post shared by Aakash Chopra (@cricketaakash) on

एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्याचा हा व्हिडीओ आहे. या सामन्यात खेळाडू फलंदाजाला गोलंदाजी करतो. फलंदाज रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा फटका पूर्णपणे फसतो. समोर उभा असलेला साथीदार चोरटी धाव घेण्यासाठी धावतो, पण फलंदाजाचे त्याच्याकडे लक्ष नसते. तो मैत्रिपूर्ण लढतीप्रमाणे आपल्या अंगाला लागून बाजुला उडालेला चेंडू गोलंदाजाला परत करतो. पण त्या साऱ्या गोंधळात त्याचा साथीदार मात्र धाव घेण्यासाठी स्ट्राईकच्या जवळ पोहोचलेला असतो. त्यामुळे परत केलेल्या चेंडूने गोलंदाज स्टंप उडवतो आणि त्या खेळाडूला रन-आऊट करतो असा तो संपूर्ण व्हिडीओ आहे.

प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात त्याने दोस्त दोस्त ना राहा.. असे कॅप्शनही दिलं आहे. त्याशिवाय आकाश चोप्राने या व्हिडीओला मजेशीर पद्धतीचं धावतं समालोचनही केलं आहे.