कतार या देशाला २०२२मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची संधी देणे, ही घोडचूकच ठरणार आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान कतारमध्ये हिवाळा असल्यामुळे ते खेळाडूंसाठी अडचणीचे ठरणार आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) कार्यकारी समितीचे सदस्य थिओ झ्वानझिगर यांनी टीका केली आहे.
उन्हाळ्यात फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या विरोधात असलेले ‘फिफा’चे अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्या निर्णयामुळे कतार या आखातातील छोटय़ा देशाला फिफा विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळाले. जर्मन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले झ्वानझिगर म्हणाले, ‘‘फिफा विश्वचषक ही स्पर्धा हिवाळ्यात खेळवण्याच्या निर्णयामुळे जर्मनीतील फुटबॉल धोक्यात येणार आहे. या निर्णयामुळे जर्मनीतील हौशी आणि व्यावसायिक फुटबॉलचे स्वरूप आता बदलावे लागणार आहे. फिफाच्या या निर्णयाचा फटका बुंडेसलिगा या स्पर्धेपाठोपाठ अन्य स्पर्धानाही बसणार आहे. हिवाळ्यात ही स्पर्धा कतारमध्ये आयोजित करणे म्हणजे प्रेक्षकांनाही हाडे गोठवणाऱ्या थंडीत स्टेडियमवर उपस्थित राहावे लागणार आहे.’’