जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत.

‘हा’ संघ ठरू शकतो ‘विराटसेने’साठी डोकेदुखी – रवी शास्त्री

भारताचे दोन दमदार ऑफ स्पिनर आर. अश्विन आणि हरभजन सिंग या दोघांनी मिळून नुकताच एक लाईव्ह संवाद साधला. चाहत्यांशी संवाद साधता-साधता त्यांनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये दोघांनी अनेक गोष्टीबाबत चर्चा केली. दोघेही एकाच वेळी भारतीय संघात अनेक सामने खेळले असल्याने त्यांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. याच दरम्यान हरभजनने अश्विन सध्याच्या घडीला सर्वोत्तम ऑफ स्पिनर असल्याचेही सांगितलं.

‘विराट म्हणजे…’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

हरभजन म्हणाला, “अनेकांना वाटतं की आपण एकमेकांवर जळतो. पण मला सगळ्या चाहत्यांना सांगावंस वाटतं की तसं अजिबात काहीही नाही. अश्विन सध्या क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंपैकी सर्वोत्तम ऑफ स्पिनर आहे. मला ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायनपण आवडतो. ऑस्ट्रेलिया सारख्या फिरकी गोलंदाजीला क्वचितच पोषक ठरणाऱ्या खेळापट्ट्या लक्षात घेता लायनने खूपच चांगली कामगिरी केली आहे. पण अश्विन त्याच्यापेक्षाही चांगला आहे. मला आता एवढंच वाटतं की अश्विनने तंदुरुस्त राहावं आणि भारतासाठी अधिक चांगली कामगिरी करावी”, असे हरभजन म्हणाला.