विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात केली. भारतीय संघाच्या या विजयाला वादाची किनार लाभली आहे. फलंदाजीदरम्यान अखेरचं षटक खेळत असताना रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला. पहिला डाव संपल्यानंतर वैद्यकीय टीमने जाडेजावर उपचार करायला सुरुवात केले. टीम इंडियाने Concussion Substitute नियमाअंतर्गत युजवेंद्र चहलला खेळवण्याची परवानगी मागितली. सामनाधिकारी डेव्डी बून यांनीही ही परवानगी मान्य करत चहलला खेळण्याची संधी दिली. परंतू ऑस्ट्रेलियाच्या संघाला हा निर्णय पटला नाही. प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मैदानावरच सामनाधिकारी बून यांच्याशी चर्चा करुन आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – Ind vs Aus : Playing XI मध्ये नसतानाही चहल गोलंदाजीला कसा आला?, जाणून घ्या नियम

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू हेन्रिकेजनेही सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. “जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला आणि त्याला त्याचा त्रास झाला असेल यात शंकाच नाही. यानंतर बदली खेळाडू घेण्याचा निर्णय झाला, त्यावरही आमचं काही म्हणणं नाही. पण त्याच्या बदली खेळवण्यात आलेला खेळाडू हा त्याच्या तोडीचा होता का?? (Like a Like) हा खरा प्रश्न आहे. जाडेजा हा अष्टपैलू आहे आणि चहल हा गोलंदाज आहे.”

अवश्य वाचा – सामनाधिकाऱ्यांनी परवानगी दिली, मग प्रॉब्लेम काय आहे? Concussion Substitute प्रकरणी गावसकरांचं रोखठोक मत

चहल मैदानावर येण्याच्या निर्णयाला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आक्षेप घेतला. दरम्यान ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतलेली आहे, या मालिकेतला दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : अभ्यास केला जाडेजाचा, प्रश्न आला चहलचा; पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय