19 October 2020

News Flash

IND vs BAN : मैदानावर पाऊल ठेवताच ‘हिटमॅन’चं शतक

कोणालाही न जमलेलं काम रोहितने करुन दाखवलं

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या रोहित शर्माने अनोखा विक्रम केला आहे. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध बडोद्याच्या मैदानातला दुसरा टी-२० सामना रोहितच्या टी-२० कारकिर्दीतला शंभरावा सामना ठरला आहे. रोहितने पाकिस्तानचा माजी आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीचा ९९ सामन्यांचा विक्रम मोडला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहितचा अपवाद वगळता धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. धोनीने आतापर्यंत ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. या यादीमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक रोहितच्या पुढे आहे, त्याने आतापर्यंत १११ टी-२० सामने खेळले आहेत.

दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशकडून भारताला पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती, यानंतर बदलाचे संकेत देऊनही रोहित शर्माने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघामध्ये बदल केले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 7:35 pm

Web Title: ind vs ban 2nd t20i indian captain rohit sharma achieves rare feat becomes first indian to played 100 t20i psd 91
Next Stories
1 IND vs BAN 2nd T20 : ‘हिटमॅन’ वादळाचा बांगलादेशला तडाखा; भारताची मालिकेत बरोबरी
2 ४ ओव्हर्स, ४ विकेट्स आणि शून्य धावा; भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाचा धमाका
3 IND vs BAN : दुसऱ्या टी २० सामन्यात होणार हे ३ विक्रम?
Just Now!
X