News Flash

Video : फलंदाजीत फ्लॉप पण क्षेत्ररक्षणात सुपरहिट ! संजू सॅमसनचा हा व्हिडीओ एकदा पाहाच…

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ५-० ने जिंकत भारतीय संघाने नवीन इतिहास घडवला. मात्र या सामन्यात काही खेळाडूंनी निराश केलं. युवा फलंदाज संजू सॅमसनला अखेरच्या सामन्यात रोहित शर्माऐवजी सलामीला येण्याची संधी देण्यात आली, मात्र केवळ दोन धावा काढत सॅमसन माघारी परतला. सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला अपयश आलं. मात्र क्षेत्ररक्षणात सॅमसनने आपलं १०० टक्के योगदान देत स्वतःची निवड सार्थ ठरवली.

मुंबईकर शार्दुल ठाकूर सामन्यातलं आठवं षटक टाकत होता. रॉस टेलरने या षटकात एक टोलेजंग फटका लगावला. हा फटका पाहिल्यानंतर प्रत्येकाने चेंडू सीमारेषेपार जाणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र सीमारेषेवर उभ्या असलेल्या संजू सॅमसनने हवेत उडी मारत चेंडू आत ढकलला आणि संघासाठी उपयुक्त अश्या ४ धावा वाचवल्या. संजूच्या या भन्नाट क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 5:09 pm

Web Title: ind vs nz 5th t20i watch sanju samson save 4 runs for his team in stunning way psd 91
टॅग : Ind Vs Nz,Sanju Samson
Next Stories
1 Ind vs NZ : भारताने मालिका जिंकली, तरीही सोशल मीडियावर शिवम दुबे ठरतोय टीकेचा धनी
2 एका फटक्यात सगळे हिशोब चुकते ! न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाने रचला इतिहास
3 Ind vs NZ : कोणालाही न जमलेली कामगिरी बुमराहने करुन दाखवली, तुम्हालाही वाटेल अभिमान
Just Now!
X