भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात, यजमान संघाने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. ५०२ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी कोलमडला होता. ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर, तिसऱ्या दिवशी डीन एल्गर-बावुमा आणि डुप्लेसिस यांनी संयमीपणे खेळी करत आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. अखेरीस तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली आणि इशांत शर्माने सापळा रचत आफ्रिकेच्या बावुमाला माघारी धाडत आफ्रिकेची जोडी फोडली.

खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडून आत येत असल्याचं पाहताच विराटने इशांतला चेंडूची दिशा बदलण्याचा सल्ला दिला. इशांतनेही कर्णधाराचा सल्ला ऐकत योग्य टप्प्यावर चेंडू ठेवत बावुमाचा बळी घेतला.

बावुमा १८ धावा काढून इशांतच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार डु-प्लेसिस आणि एल्गर यांनी पुन्हा एकदा सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत आफ्रिकेचा डाव सावरला.