02 December 2020

News Flash

सानिया-झेंग पराभूत

सानिया मिर्झा आणि तिची चीनची साथीदार जी झेंग जोडीला अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

| September 7, 2013 02:47 am

सानिया मिर्झा आणि तिची चीनची साथीदार जी झेंग जोडीला अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकित अ‍ॅशलेह बार्टी आणि कॅसे डेलाअ‍ॅक्वा जोडीने दहाव्या मानांकित मिर्झा-झेंग जोडीवर ६-२, ६-२ अशी सहज मात केली. दोन्ही सेटमध्ये बार्टी-डेलाअ‍ॅक्वा जोडीने सानिया-झेंग जोडीची सव्‍‌र्हिस तीनदा भेदली. मिश्र दुहेरीत रोमानियाच्या होरिया टेकाऊच्या साथीने खेळताना सानियाचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. रोहन बोपण्णा, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या तिघांचेही मिश्र दुहेरीतील आव्हान झटपट संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:47 am

Web Title: india at us open sania mirza jie zheng out of wimbledon champions
टॅग Sania Mirza
Next Stories
1 पेस-स्टेपानेक अंतिम फेरीत
2 जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे पुनरागमन
3 भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीला आशियाई समितीची मान्यता
Just Now!
X