वर्षांच्या उत्तरार्धात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, स्टेडियममधील प्रेक्षकसंख्या वाढवण्याच्या इराद्याने भारत पहिलीवहिली दिवस-रात्र कसोटी त्यांच्याशी खेळणार आहे.
‘‘न्यूझीलंडविरुद्ध एक प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याआधी दिवस-रात्र कसोटी सामन्याची रंगीत तालीम म्हणून दुलीप करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. उपखंडातील वातावरणात गुलाबी कुकाबुरा चेंडू कसा प्रभावी ठरतो तसेच दवाचा घटक याची चाचपणी करण्यासाठी दुलीप करंडक सामन्याचा आम्ही उपयोग करणार आहोत,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. भारतातील सर्व आघाडीचे खेळाडू दुलीप करंडक स्पध्रेत खेळणार आहेत.

बद्रीऐवजी शम्सी
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुखापतग्रस्त सॅम्युअल बद्रीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सीचा समावेश करण्यात आला आहे. शम्सी ‘चायनामन’ फिरकीपटू असून कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळला आहे.