भारत आणि पाकिस्तानचे संघ आज १५ महिन्यांनंतर एकमेकांसमोर मैदानात उभे ठाकणार आहेत. काल हाँगकाँगविरुद्धच्या समान्यापासूनच अनेक पाकिस्तानी तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचे वेध लागले आहेत. हाँगकाँगसारख्या दुबळ्या संघासमोर भारताची झालेली दमछाक पाकिस्तानी नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली. आज सकाळपासूनच ट्विटर आणि फेसबुकवर या बहुप्रतिक्षित सामन्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आकडेवारी आणि पाकिस्तानी संघासाठी होम ग्राऊण्ड असल्यासारखेच
असलेले दुबईचे मैदान या दोन कारणांमुळे पाकिस्तानचे पारडे जड वाटत असले तरी मागील काही वर्षांपासून चॅम्पियन्स चषक वगळता नेहमी भारताचेच पारडे जड राहिले आहे. म्हणूनच की भारतीय नेटकऱ्यांनी सामना सुरु होऊन त्याचा निकाल लागण्याआधीच पाकिस्तानी संघाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाहुयात असेच काही मजेशीर ट्विटस

पाकिस्तानी संघाची सध्याची स्थिती…

आजही पाकिस्तानमध्ये टिव्ही फुटणार का?

ऐकावे ते नवलच…