04 March 2021

News Flash

मॅथ्यू वेडची तुफान फटकेबाजी; भारताविरोधात केला हा विक्रम

भारतासमोर १८७ धावांचं आवाहन

यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघानं तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतासमोर १८७ धावांचं आवाहन ठेवलं आहे. मॅथ्यू वेडनं तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मॅथ्यू वेडनं ८० धावांची खेळी केली. मॅक्सवेलनं ५४ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.

मॅथ्यू वेडनं ५३ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं ८० धावांची खेळी केली. मॅथ्यू वेडचं हे कारकिर्दीतील दुसरं अर्धशतकं होय. विशेष म्हणजे मॅथ्यू वेडची दोन्ही अर्धशतकं भारताबरोबरच आहेत. पहिल्या सामन्यात वेडनं ५८ धावांची खेळी केली होती. हा विक्रम मोडीत काढत वेडने ८० धावांची खेळी केली. मॅथ्यू वेडच्या टी-२० मधील पहिल्या तीन सर्वोच्च खेळ्या भारतीय संघाबरोबरच आहेत.

मॅथ्यू वेडनं ३२ टी-२० सामन्यातील २२ डावां फलंदाजी करताना दोन अर्धशतकाच्या मदतीनं ३४८ धावा काढल्या आहेत. मॅथ्यू वेडची दोन्ही अर्धशतकं भारताविरोधात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 3:49 pm

Web Title: india vs australiamatthew wades highest t20i score india tour australia nck 90
Next Stories
1 Super Sanju : सॅमसनचं अफलातून क्षेत्ररक्षण; पाहा व्हिडीओ
2 ‘विरुष्का’च्या या फोटोने ट्विटरवर घातला धुमाकूळ, मोडले सर्व विक्रम
3 …म्हणून जाडेजाऐवजी चहलला संधी देण्यात आली ! जाणून घ्या पडद्यामागे नेमकं काय घडलं??
Just Now!
X