भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका काही कारणास्तव होऊ शकली नसली तरी या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पध्र्याचा सामना आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट विश्वाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २७ फेब्रुवारीला होणार आहे.
यावर्षीपासून आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकारामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यासह श्रीलंकेचाही समावेश आहे.