अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशच्या संघाला हरवत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये बांग्लादेशच्या संघाचा सात गडी राखून भारताने आपले स्थान अंतिम फेरीत निश्चित केले आहे. यानंतर अंतिम फेरीमध्ये भारताचा पाकिस्तानशी होणार आहे. गणेशभाई मधुकर हा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला असून त्याने ६९ बॉलमध्ये ११२ धावा करत अतिशय चांगली कामगिरी केली. याची अंतिम फेरी २० जानेवारी रोजी असून शारजा येथे होणार आहे.

सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी केली. यामध्ये त्यांनी ३८.५ ओव्हरमध्ये केवळ २५६ धावांचा टप्पा गाठला. बांग्लादेशच्या संघाची सुरुवातच अतिशय खराब झाली आणि पहिल्या ५० धावांच्या आधीच बांग्लादेश संघाचे २ खेळाडू बाद झाले होते. त्यामुळे संघाची कामगिरी सुरुवातीपासूनच काहीशी खराब असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र यातगी अब्दुल मलिक याने नाबाद १०८ धावा करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवले आहे. तर भारतीय संघातील दुर्गा रावने २० धावांच्या मोबदल्यात तीन गडी टिपले. दिपक मालिक आणि प्रकाश यानेही दोन दोन विकेट घेत चांगली कामगिरी केली. दिपकने ४३ चेंडूंमध्ये ५३ धावा काढत फलंदाजीही अतिशय चांगली केली. तर नरेश याने १८ चेंडूंमध्ये ४० धावा करत भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.