RPSG Company Owner Sanjeev Goenka : आयपीएल २०२४ मधील ५७व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सचा १० विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल दिसत आहेत. या फोटोमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर संजीव गोयंका केएल राहुलवर ओरडताना दिसत आहे. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल शांतपणे संजीव गोयंकाचे ऐकत आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची प्रोफाइल तुम्हाला माहिती आहे का? तसेच संजीव गोयंका यांची एकूण संपत्ती किती आहे? वास्तविक, संजीव गोयंका यांचा जन्म कोलकाता येथे झाला, ते येथेच वाढले. यानंतर त्यांनी प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉमचे शिक्षण घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती अंदाजे ३.४ अब्ज डॉलर्स आहे. याशिवाय यावर्षी फोर्ब्सने आपल्या यादीत संजीव गोएंका यांना ९४९ व्या क्रमांकावर ठेवले आहे. संजीव गोयंका हे आरपीएसजी कंपनीचे अध्यक्ष आहेत.

gurucharan singh missing update
१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Kangana Ranaut
कंगना रणौतकडे ७ किलो सोनं, ६० किलो चांदी, आलिशान कार्स आणि बंगले, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
Rajasthan Royals Owner Hit Ross Taylor In IPL 2011
IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

संजीव गोयंका फुटबॉल टीम मोहन बागानचे मालक –

आयपीएल टीम लखनऊ सुपर जायंट्स व्यतिरिक्त संजीव गोयंका हे प्रसिद्ध फुटबॉल टीम मोहन बागानचे मालक आहेत. संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी कंपनीत ५० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. भारताव्यतिरिक्त ही कंपनी जगभरात कार्बन ब्लॅक, पॉवर, आयटी, रिटेल उत्पादने, मीडिया मनोरंजन, क्रीडा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यवसाय करते. संजीव गोयंका यांनी आयआयटी खरगपूरचे बोर्ड सदस्य म्हणूनही काम केले आहे.

हेही वाचा – IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात

संजीव गोयंकाची आयपीएलमध्ये दुसरी टीम –

संजीव गोयंका हे दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये परतले आहेत. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्येही संजीव गोयंका यांच्या मालकीचा संघ आयपीएलमध्ये होता. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी होती. तेव्हा गोयंका यांच्या मालकीचा रायझिंग पुणे सुपर जायंट्स हा संघ मैदानात होता. ज्या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टीव्ह स्मिथसारखे दिग्गज खेळाडू होते. तेव्हा या संघाचा कर्णधार धोनी होता.