ऑलिम्पिक पात्रता फेरी

भारतीय महिला २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. २०२०च्या एएफसी ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचा पहिला सामना गुरुवारी नेपाळशी होणार आहे.

या स्पर्धेत विजयी सुरुवात करून तीन गुण मिळवण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक आहे. गेल्या चार स्पर्धामध्ये भारतीय संघाला पात्रता फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. मात्र मुंबईतील झालेल्या तीन आठवडय़ांच्या सराव शिबिरामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रशिक्षक मायमोल रॉकी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने कसून सराव केला.

ते म्हणाले की, ‘‘भारताचे पहिले दोन सामने नेपाळ आणि बांगलादेशविरुद्ध होणार असल्यामुळे या सामन्यात विजयाची संधी भारताला आहे. त्याचबरोबर अखेरचा सामना भारतात होणार आहे. याचा फायदा आम्हाला होईल.’’