25 January 2021

News Flash

IPL 2020 : ख्रिस गेलचा करोना चाचणी अहवाल निगेटीव्ह

उसेन बोल्टच्या पार्टीत सहभागी झाला होता गेल

१. ख्रिस गेल - ३२६

आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला युएईत सुरुवात होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा संघाचासलामीवीर ख्रिस गेलचा करोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. जमैकाचा धावपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता उसेन बोल्टच्या पार्टीत गेलने हजेरी लावली होती. या पार्टीनंतर बोल्टचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचं वृत्त होतं. परंतू करोनाने आयपीएलआधी दोनवेळा आपली करोना चाचणी करवून घेतली, ज्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

गेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये आपण केलेल्या करोना चाचणीची माहिती दिली आहे.

२०१९ च्या हंगामात पंजाबकडून खेळत असताना गेलने ३६८ धावा केल्या होत्या. आगामी हंगामातही गेल सहभागी होणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल हंगामाचं आयोजन हे युएईत केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:14 pm

Web Title: ipl 2020 kxip opener chris gayle tests negative for coronavirus after attending usain bolts birthday party psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी रायन हॅरिसची नियुक्ती
2 IPL 2020: प्रेक्षक नसल्याचा क्रिकेटच्या दर्जावर परिणाम होईल? लक्ष्मण म्हणतो…
3 IPL 2020: सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती
Just Now!
X