News Flash

इरफान पठाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल बायकोनं सोडलं मौन, म्हणाली…

“मी तिचा मालक नसून जोडीदार आहे'', असं म्हणत इरफाननं दिलं होतं टीकाकारांना उत्तर

पत्नीसह इरफान पठाण

माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणला आपल्या पत्नीसंदर्भातील एका फोटोमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी इरफानच्या कुटुंबाचा एका फोटो व्हायरल झाला. फोटोमध्ये इरफानसोबत त्याची पत्नी आणि मुलगा दिसत असून तिघेही मैदानामध्ये उभे असल्याचे दिसत होते. मात्र या फोटोमध्ये इरफानची पत्नी सफाचा चेहरा ब्लर करुन लपवण्यात आलाय. यावरुन अनेकांनी इरफानवर आणि त्याच्या विचारसरणीवर टीका केली. यावर इरफानने आपले उत्तर दिले होते. आता त्याच्या पत्नीनेही इरफानची पाठराखण करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सफा म्हणाली, ”मी माझा मुलगा इम्रानसाठी इन्स्टाग्रामवर एक अकाउंट तयार केले होते आणि मी तिथे पोस्ट करते, जेणेकरून तो मोठा झाल्यावर त्याच्यासाठी काही सुंदर आठवणी राहतील. मी हे अकाउंट हाताळते आणि विशेषत: त्या फोटोसाठी, मी माझ्या आवडीने माझा चेहरा ब्लर केला होता. हा पूर्णपणे माझा निर्णय होता आणि इरफानचा याच्याशी काही संबंध नाही.”

हेही वाचा – अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!

इरफानने दिलेले उत्तर

इरफानने यासंदर्भात ट्विटवरुन स्पष्टीकरण देत टीकाकारांना त्यांच्याच खोचक भाषेत सुनावले होते. “हा फोटो माझ्या क्वीनने (पत्नी) माझ्या मुलाच्या अकाउंटवरुन स्वत: पोस्ट केला. या फोटोवरुन आम्हाला अनेकांनी वाईट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळेच मी हा फोटो इथेही पोस्ट करत आहे. माझ्या पत्नीने तिच्या इच्छेनुसारच या फोटोत स्वत:चा चेहरा ब्लर केला. आणि हो मी तिचा मालक नाहीय जोडीदार आहे,” अशा कॅप्शनसहीत इरफानने त्याच्या कुटुंबाचा व्हायरल फोटो आपल्या अकाउंटवरुन पोस्ट केला होता. त्याने हर लाइफ हर चॉइस म्हणजेच तिचे आयुष्य तिची निवड असा हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरला होता.

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सनं IPLचं केलं ‘भन्नाट’ पद्धतीनं स्वागत, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

 

इरफान अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करतो. मात्र त्यामध्येही त्याच्या पत्नीचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे दिसून येते. नुकताच इरफान पत्नी आणि मुलासोबत रशियामध्ये फिरायला गेला होता. तेव्हा पोस्ट केलेल्या फोटोंमध्येही त्याच्या पत्नीचा चेहरा दिसत नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 11:44 am

Web Title: irfan pathans wife safa baig shields her husband over picture controversy adn 96
Next Stories
1 अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!
2 ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा महाराष्ट्रात?
3 ‘आयपीएल’ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अमिरातीत!
Just Now!
X