इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी मोठे आव्हान देण्यात आले. केप टाऊनच्या मैदानावर सामना सुरू असताना एका गोष्टीमुळे साऱ्यांनाच हसू फुटले. मैदानावर दोनही संघांमध्ये चुरस सुरू असताना स्टेडियमवरील चाहत्यांमध्ये मात्र एकच हशा पिकला. इंग्लंडच्या अंतिम संघात स्थान न मिळाल्याने जॉनी बेअरस्टो संघाबाहेर बसला होता. सामना सुरू असताना तो दुर्बिणीने काही तरी पाहण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कॅमेरामनने केलेल्या करामतीमुळे स्टेडियममध्ये हशा पिकला.

गंभीर-इरफान यांच्यात ‘या’ मुद्द्यावरून मतभेद

जॉनी बेअरस्टो सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॅव्हेलियनमध्ये बसला होता. तो दुर्बिणीने सामना पाहण्याचा प्रयत्न करत होता. पण, या सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेरामन आणि निर्मात्याने त्याची चांगलीच फिरकी घेतली. बेअरस्टो जेव्हा जेव्हा दुर्बिणीने काही पाहण्याचा प्रयत्न करत असायचा, तेव्हा निर्माता आणि कॅमेरामन स्टेडियमवर उपस्थित मुलींकडे कॅमेरा वळवायचा. असे दोन ते तीन वेळा झाल्यावर मात्र बेअरस्टोने दुर्बिण खाली केली. पण या प्रकारामुळे बेअरस्टो सामना सुरू असताना स्टेडियममधील सुंदर मुलींना पाहतोय की काय, असा समज होईल असं चित्र मजेशीर पद्धतीने निर्माण करण्यात आलं. हा प्रकार पाहून समालोचकांनाही हसू आवरलं नाही.

“भारतात भारताविरूद्ध खेळणं सगळ्यात अवघड”; ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली

पाहा धमाल व्हिडीओ

दरम्यान, सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील २६९ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने २२३ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ३९१ धावांवर घोषित केले. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात डॉम सिब्ली याने १३३ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याला बेन स्टोक्सने (७२) चांगली साथ दिली आणि आफ्रिकेला ४३८ धावांचे लक्ष्य दिले.